Chinchwad : आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा : महापौर राहुल जाधव

अग्रवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज- प्रत्येक मुलाने आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासहित पुणे जिल्ह्यात राहणारे अग्रवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांंचा सन्मान चिंचवड येथील अग्रसेन भवनात नुकताच संपन्न झाला.यावेळी ते महापौर बोलत होते.

एस्सेन ग्रुप आणि वसंत ग्रुप व अग्रवाल समाजाच्या वतीने इयत्ता 10 वी व 12 वीच्या 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांंचा, लॉ, वैद्यकीय, सीएए अभियांत्रिकी, क्रीडा, कला, आर्किटेक्ट, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी आणि इतर पदवी परीक्षेत उल्लेखनीय क्रमांक मिळविलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी श्री अग्रसेन ट्रस्ट प्राधिकरण अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, वसंत समूहाचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, चिंचवडचे युवा आइकॉन अनुप मोरे, मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य तेजस्विनी कदम, भाजपा आयटी सेलचे अध्यक्ष राजेश राजपूत आणि समन्वयक आदित्य कुलकर्णी, अग्रवाल समाज महासंघाच्या महिला अध्यक्षा नीता अग्रवाल, पुणे शहर महिला अध्यक्ष सरस्वती गोयल, तुळजापूरचे सुप्रसिद्ध उद्योगपती देवीचंद अग्रवाल, प्रसिध्द मॉडेल सुनंदा सूर्यवंशी, श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडचे पूर्व अध्यक्ष वेदप्रकाश गुप्ता, राजकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचा आदर करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तुम्हाला घडविण्यासाठी खस्ता खाल्या आहेत, त्याचे चीज होईल. सूत्रसंचालन भाजपा बिझिनेस सेलचे सुधीर अग्रवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश अग्रवाल यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.