Chinchwad : बुलेट चोराला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी बुलेट गाडी चोरून येणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखा (Chinchwad) युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. मागील आठवड्यात चिंचवडेनगर येथे एका दुकानासमोरून बुलेट चोरीची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा समांतर तपास करत पोलिसांनी बुलेट चोराला बेड्या ठोकल्या.
धर्मराज दत्तू बंडगर असे अटक केलेल्या बुलेट चोराचे नाव आहे. सुधीर गजभिव (वय 38, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी आठ एप्रिल रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune News : सायबर चोरट्यांनी केली 25 लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजभिव यांनी त्यांची बुलेट दुचाकी चिंचवडे नगर येथील बुलेट चहा या दुकानासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकिस आले. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने या प्रकरणाचा समांतर तपास केला. त्यामध्ये पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या (Chinchwad) मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक खरात, पोलीस अंमलदार जयवंत राऊत, देवा राऊत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.