Pune News : सायबर चोरट्यांनी केली 25 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- तुम्हाला आलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. तुम्हाला अटक होईल’, अशी भीती घालून (Pune News)  सायबर चोरट्यांनी कोथरूड येथील एका महिलेची 25लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी एका महिलेने (वय 29, रा. कोथरूड) सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर पोलिसांनी अपर्णा कृष्णन अय्यर, अजयकुमार बन्सल, भानसिंग राजपूत आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये रूटमार्चचा धडाका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 11  एप्रिल रोजी फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यांनी महिलेला ‘तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक होइल,’ अशी भीती घातली.

तसेच, त्यांना दोन वेगवेगळ्या बॅंक खात्यात ऑनलाइन पैसे पाठविण्यास भाग पाडले. त्यावर फिर्यादी महिलेने 25 लाख 62  हजार रुपये ऑनलाइन पाठवले. याबाबत महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल (Pune News) करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.