Pimple Saudagar : पक्षाचे कार्यक्रम ताकदीने राबवा; प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या माजी नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुखांना सूचना

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथे भाजपची चिंचवड विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बैठक आज (शुक्रवारी) पार पडली. (Pimple Saudagar) बुथ सक्षमीकरण अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी मतदारसंघातील संघटनेचा आढावा घेतला. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम ताकदीने यशस्वीपणे राबवा, असे आवाहन त्यांनी माजी नगरसेवक व शक्ती केंद्रप्रमुखांना केले.

या बैठकीला भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, सचिन चिंचवडे यांच्यासह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व माजी नगरसेवक व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

Pune : हरित विकासासाठी पुणे महापालिकेला मिळाले आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र

मुरलीधर मोहोळ यांनी सर्व माजी नगरसेवक व शक्तीकेंद्र प्रमुखांना बुथ सक्षमीकरण अभियान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय सप्ताह, येत्या 30 एप्रिल रोजीचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100 वा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन, पक्ष सदस्य नोंदणी अभियान या प्रमुख कार्यक्रमांसोबतच पक्षाचे अगामी सर्व कार्यक्रम व अभियानांची पूर्ण माहिती दिली. (Pimple Saudagar) तसेच चिंचवड विधानसभेतील चिंचवडगाव-किवळे मंडल व सांगवी-काळेवाडी या दोन्ही मंडलांचा संघटनात्मक व बुथ सक्षमीकरण अभियानाचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी पवना सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांचा आणि बुथ सक्षमीकरण अभियानात आपले काम पूर्ण केल्याबद्दल माजी नगरसेवक संदिप कस्पटे व विनायक गायकवाड या दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.