Pune : हरित विकासासाठी पुणे महापालिकेला मिळाले आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र

प्लॅटिनम’ नामांकन मिळवणारे देशातील दुसरे तर महाराष्ट्रातील पहिले शहर 

एमपीसी न्यूज :  इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत हरित विकासासाठी दिले जाणारे प्लॅटिनम प्रमाणपत्र (Pune) मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले, तर भारतातील दुसरे शहर बनले आहे. यापूर्वी गुजरातमधील राजकोट शहरास हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते.

शाश्वत विकासासाठी योगदान देणाऱ्या सरकारी यंत्रणा, विकसक, वास्तूविशारद आणि सल्लागारांचा सन्मान आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याला मिळालेले प्लॅटिनम नामांकनाचे प्रमाणपत्र महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वीकारले. या वेळी खासदार वंदना चव्हाण, ‘यशदा’चे महासंचालक एस.चोक्कलिंगम, आयजीबीसी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष जे.पी.श्रॉफ, सीआयआय ग्रीनकोचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या सहअध्यक्षा डॉ.पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.

Pimpri : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये रूटमार्चचा धडाका

पुणे महापालिकेने हरित धोरण आखणी, हरित पायाभूत सुविधा आणि हरित धोरणांचा स्वीकार करणाऱ्यांसाठी सवलती या उल्लेखनीय बाबी केल्या आहेत. (Pune) मागील दोन दशकांतील पुणे महापालिकेचे काम पाहून प्लॅटिनम नामांकन देण्यात आले आहे. विलास जावडेकर डेव्हलपर्स, गंगोत्री होम्स, अमर बिल्डर्स, कोहिनूर ग्रुप आणि मालपानी ग्रुप यांनाही आयजीबीसी ग्रीन प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी अनेक हरित प्रकल्प राबवल्याने त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयजीबीसीचे उपकार्यकारी संचालक एम.आनंद यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.