Pimpri : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये रूटमार्चचा धडाका

एमपीसी न्यूज – समाजात पोलिसांचा व्हिजिलन्स (Pimpri ) वाढविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व 18 पोलीस ठाण्यांमध्ये रूटमार्च काढला जात आहे. चौकाचौकात पोलीस दिसले तर गुन्हेगारांना त्याची धास्ती बसेल आणि प्रसंगी गुन्हेगारी कमी होण्यासाठी त्याचा फायदा होईल, या उद्देशाने हे रूटमार्च काढले जात आहेत.

रूटमार्चमध्ये पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रूटमार्च काढला जात आहे. ज्या भागात गुन्हेगारी अधिक आहे, अशा भागावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. या दरम्यान गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

Pimpri : डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे देश एकसंध राहिला – अजित गव्हाणे

मागील काही दिवसात शहरात स्ट्रीट क्राईम वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. चालू वर्षात सुरुवातीच्या तीन महिन्यात खुनाच्या 14 तर खुनाच्या प्रयत्नाच्या 22 घटना घडल्या आहेत. दरोड्याचे नऊ तर जबरीचोरीचे 93 गुन्हे पहिल्या तीन महिन्यात दाखल आहेत. दररोज एका ठिकाणी जबरी चोरी होत आहे. रस्त्याने जाणारे नागरिक, महिला, तरुणांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणे देखील सुरक्षित नाही.

महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात सर्व कंपन्यांचे पगार होतात. कामगारांना रोख पगार मिळाल्यानंतर पगार घेऊन घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला करून लुटण्याचे प्रकार घडतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पोलीस व्हिजिलन्स वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी पहिले पाऊण म्हणून रूटमार्च काढला जात आहे. या रूटमार्चचा गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे (Pimpri ) ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.