Pimpri : डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे देश एकसंध राहिला – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – महामानवांच्या विचारातून उद्याचा समाज घडत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपला संपूर्ण देश एकसंध राहिला आहे. (Pimpri) हेच बाबासाहेबांचे आपल्या देशावर खूप मोठे उपकार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात  गव्हाणे बोलत होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष  गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, निकिता कदम, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष संजय औसरमल, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, देवेंद्र तायडे, संतोष निसर्गंध, संदीपान झोंबाडे, दीपक साकोरे, बाळासाहेब पिल्लेवार, कविता खराडे, संगीता कोकणे, नीलम कदम, राजेंद्रसिंग वालिया, राजू नायर, विजया काटे, सविता खराडे, रिजवाना सय्यद, सुदाम शिंदे, सरविंदर सिंग बाला, महेश माने, ओम क्षीरसागर, संग्राम चव्हाण, अभिजीत आल्हाट, विजय पिरंगुटे, माणिकराव जैध पाटील, अशोक मोरे, शिवाजी अभंग, संजीवनी पुराणिक, विजया टिंगरे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News : इंदू मिल येथील स्मारक जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल – राज्यपाल रमेश बैस

यावेळी बोलताना माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे म्हणाले, (Pimpri) डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर या ठामपणे उभ्या होत्या म्हणूनच बाबासाहेब घडू शकले. त्यांचेही चळवळीत मोठे योगदान राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  11 ते 14 एप्रिल या कालावधीत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मागासवर्गीय वस्त्यांमध्ये संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. गुरुवारी (दि. 13) विठ्ठलनगर, नेहरूनगर येथे ‘संविधान ओळख’ अभियान राबविण्यात आले.(Pimpri) या अभियानाद्वारे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. तसेच संविधानाच्या संक्षिप्त स्वरुपातील प्रतींचे वाटप करण्यात आले. याशिवाय शहरातील विविध वस्त्यांमध्ये पाच हजार संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.