Alandi News : आळंदी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त (Alandi News )आळंदी देवाची येथे भारतीय बौद्ध महासभा आळंदी शहर शाखेच्या वतीने सामूहिक बुद्ध वंदना त्रिसरण पंचशील याचे पठण करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याबाबत माहिती भारतीय बौद्ध महासभा आळंदी शाखेचे सरचिटणीस  तुषार रंधवे यांनी दिली.
तसेच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तआळंदी पोलीस स्टेशन,आळंदी नगरपरिषद , श्री माऊली भाजी मंडई,केंद्रीय मानवाधिकार संघठन व शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

Chinchwad : बुलेट चोराला गुन्हे शाखेकडून अटक

 सायंकाळी सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक चित्ररथासह आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यावेळी हजारो आळंदीतील नागरिक यामध्ये सहभागी  झाले होते.आळंदी पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिसांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
चऱ्होली येथील तनिष सृष्टी येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सांस्कृतिक (Alandi News ) कार्यक्रम,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व मुलांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन तनिष सृष्टीच्या वतीने करण्यात आले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.