Alandi : श्रीरामनवमी निमित्त माऊलींचे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – आज (दि. 17) रोजी रामनवमी निमित्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून    सुंदर आणि मनमोहक असे शिंदेशाही पगडी अवतार रूप (Alandi) साकारण्यात आले.चंदनउटीतून समाधीवर(Alandi) साकारण्यात आलेल्या शिंदेशाही पगडी अवतार दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Alandi: आळंदी मध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ही चंदन उटी अभिजित धोंडफळे व  त्यांचे सहकारी यांनी देवस्थानच्या सहकार्याने  साकारली.मंदिरामध्ये रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. तसेच रामनवमी निमित्त आज वारकरी शिक्षण संस्थेत सायंकाळी पाच च्या सुमारास अनेक भाविकांना प्रसाद देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.