Loksabha election : अमोल कोल्हे,रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

एमपीसी न्यूज : – महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडीचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व रविंद्र धंगेकर हे उद्या गुरूवार दि. 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज(Loksabha election) दाखल करणार आहेत. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या सकाळी 10.30 वा., शांताई हॉटेल समोर, रास्ता पेठ, कॅम्प, पुणे  येथे ‘‘जाहीर सभा’’ आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट), शहराध्यक्ष संजय मोरे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि सुदर्शन जगदाळे(आप) यांनी केले आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार महाविकास आघाडीने जोरात सुरू केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीतील नेत्यांवर  महाविकास आघाडीने जोरदार हल्लाबोल चढविला आहे.
Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share