Pune : शिरुर तालुक्यात होणार 329 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना

एमपीसी न्यूज : जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील (Pune) मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि इतर 19 गावातील 329 कोटी 45 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्धघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र शासन प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचे जल जीवन अभियान राबवित आहे. याअंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 हजार कोटी रुपये तर पुणे जिल्ह्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार  आहेत. शिरुर तालुक्यातील 34 पाणी पुरवठा योजनेसाठी 571 कोटी 38 लाख मिळाले आहेत.  ही कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

Alandi News : आळंदी मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

राज्य शासनाच्या वतीने नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. शिरुर-हवेली-दौंड तालुक्यातील गावांना जोडणारा भीमा नदीवरील पूल (Pune) उभारणीबाबतची मागणी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. पुलाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकासकामांसोबतच रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केल्यास, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याला प्राधान्य देऊ, ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

 

329 कोटी 45 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन:

यावेळी तळेगाव ढमढेरे पाणीपुरवठा योजना- 13 कोटी 4 लाख, शिक्रापूर रेट्रोफीटिंग 7 कोटी 23 लाख, इनामगाव व तीन गावे प्रादेशिक 41 कोटी 17 लाख, निमोणे 7 कोटी 3 लाख, कोरेगाव भीमा वाडा पुनर्वसन प्रादेशिक 22 कोटी 76 लाख, आंबळे 7 कोटी 29 लाख, निर्वी 6 कोटी 36 लाख, रांजणगाव सांडस 10 कोटी 73 लाख, सादलगाव वडगाव रासाई रेट्रोफिटिंग 14 कोटी, नांगरगाव आंदळगाव प्रादेशिक 24 कोटी7 लाख, कोंढापुरी 9 कोटी 7 लाख, गुनाट 10 कोटी 19, निमगाव म्हाळुंगी 13 कोटी 93 लाख, वढू बुद्रुक 11 कोटी 75 लाख, करडे 13 कोटी ४५ लाख, सणसवाडी 32 कोटी 19 लाख, ढोक सांगवी  49 कोटी 77 लाख, आलेगाव पागा 15 कोटी 68 लाख, उरळगाव 7 कोटी 73 लाख रुपये अशा पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन करण्यात आले.

विठ्ठलवाडी पाणीपुरवठा योजना 11 कोटी 11 लाख रुपये खर्चाची असून या योजनेत विठ्ठलवाडी गावासोबत डाळवस्ती, वेगरेवस्ती, महानुभावमळा, चोरमाळवस्ती, भोसेवस्ती, (Pune) मधलामळा, शिंदेवस्ती या वस्त्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या योजनेत 5 हजार 278 नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.