Pune : पुण्यातील शिवाजीनगर भागातील गोळीबार प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना यश

वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येची 75 लाख रुपयांची सुपारी; वडिलांसह ६ जणांना पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज – गेल्या आठवड्यात पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यातील उच्चभ्रू भागात झालेले हे गोळीबार प्रकरण उघडकीस आणण्यास पुणे पोलिसांना यश आले असून बांधकाम व्यावसायिकाच्या वडिलांसह 6 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय 38) यांचे जंगली महाराज रस्त्यावर(Pune) कार्यालय आहे. 18 एप्रिल रोजी धीरज दिनेशचंद्र अरगडे त्यांचे काम संपवून दुपारी ३ वाजता घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले असता त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण अरगडे यांच्या कारजवळ आले व त्यांनी तिथे दुचाकी लावली. दुचाकीवरील सहप्रवाशाने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी आरोपीची पिस्तूल लॉक झाली आणि आरोपींचा धीरज यांच्यावर गोळीबार करण्याचा डाव फसला. धीरज दिनेशचंद्र अरगडे यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून लगेचच(Pune) पळून गेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. खडकी) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

Pune पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरूच; दोन दिवसात तीन ठिकाणी फायरींग

या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी केला असता वडिलांनीच संपत्तीच्या वादातून मुलाला जीवे मारण्याची योजना केली असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी वडिलांसह 6 जणांना अटक केली आहे. धीरज अरगडे यांच्या वडिलांनी 50 लाख रुपयांची  सुपारी आरोपींना देण्याचे ठरवले होते. त्यातील 25 लाख रुपये आधी आणि 25 लाख काम झाल्यानंतर आरोपींना देण्याचे ठरले गेले होते. या  घटनेचा सीसीटीव्ही फुटेजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.