Pune : प्राध्यापकाचा हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू, सहा महिन्यानंतर हॉटेल प्रशासनावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कामानिमित्त कलकत्ता येथून पुण्यात आलेल्या (Pune) प्राध्यापकाचा गणेशखिंड रस्त्यावरील प्राइड हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना 2 एप्रिल 2023 रोजी घडली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी काल (मंगळवारी) तक्रार देण्यात आली आहे.

मोहित प्रमोद आगरवाल (वय 35, रा. बी. के. पॉल ॲव्हेन्यू, कोलकता) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे नातेवाईक अमर संतोष मनका यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PMPML : पीएमपीएमएलतर्फे आता शनिवार-रविवार 25 टक्के सवलतीत मिळणार बस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरवाल हे सनदी लेखापाल अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. एका संस्थेत ते व्याख्यान देणार होते. ही दुर्घटना घडली तेव्हा जीवरक्षक जलतरण तलाव परिसरात उपस्थित नव्हता. आगरवाल बुडाल्याचे उघडकीस आल्यानंतर जीवरक्षक यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले.

अगरवाल यांना वेळेत मदत व वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ज्याला हॉटेल व्यवस्थापन, तसेच जीवरक्षकांच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाजीराव नाईक करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.