Worldcup 2023 : पाकिस्तानचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; विश्वचषकातील सर्वोच्च लक्ष्य केले पार

एमपीसी न्यूज – विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या ( Worldcup 2023 ) असलेले 345 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार करत विश्वचषकातील विक्रम आपल्या नावे केला. तसेच एकाच सामन्यात चार शतक लागण्याचा विक्रमही पाकिस्तान श्रीलंकेच्या सामन्यात नोंदवला गेला.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा सलामी फलंदाज कुशल परेरा याला खातेही खोलता आले नाही . हसन आली याने त्याला चालते केले.  सलामीवीर निसंका याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली, त्यानंतर कुशल मेंडीस याने 77 चेंडूत 122 धावांची तुफानी  शतकी खेळी केली .

तसेच समरविक्रमाने 108 धावांची खेळी केली पण दोघांचेही शतक व्यर्थ ठरले.  श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमावून 345 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानच्या जलद गती गोलंदाज हसन अली याने 4 गडी बाद केले, तर हरीस रौफ याने 2 गडी बाद केले. तरीही त्यांना श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखता आले नाही.

Mahabaleshwar : सेल्फीचा मोह बेतला जीवावर, धनकवडी येथील महिलेचा महाबळेश्वरच्या दरीत कोसळून मृत्यू

फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या हैदराबाद येथील मैदानावर हे लक्ष्य अशक्य नव्हते. चेंडू बॅटवर( Worldcup 2023 ) येत होता तरीही पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि कप्तान बाबर आजम यांनी स्वस्तात आपल्या विकेट श्रीलंकेला दिल्या . त्यानंतर आलेल्या युवा फलंदाज शफिकने मोहम्मद रिझवान याच्या सोबतीने संघाला सावरले.

शफिकने कारकीर्दीतील आणि विश्वचषकातील पहिले शतक या सामन्यांमध्ये साकारले, त्याने 113 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, त्याला मोहम्मद रिजवान ने तोकडी साथ दिली. शफिक बाद झाल्यावर मोहम्मद रिजवानाने सूत्र आपल्या हाती घेतली आणि धावगती वाढवली, मोहम्मद रिजवानने एक बाजू लावून धरून 131 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिले . पाकिस्तानने 10 चेंडू आणि 6 गडी राखून हा सामना जिंकला.

श्रीलंकेचा गोलंदाज मधुशंका यांनी 2 गडी तर पथीराणा आणि तीक्षना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही सामन्यात चार शतक लगावण्यात आले नव्हते, तो विक्रमही या सामन्यात नोंद झाला. यासोबतच श्रीलंकेला विश्वचषकात सलग आठ वेळा पाकिस्तानने  नमविले आहे.पाकिस्तानचा या स्पर्धेतला हा सलग दुसरा विजय ठरला ( Worldcup 2023 ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.