Worldcup 2023 : भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात मैदानात शिरला पॅलेस्टिनी समर्थक

एमपीसी न्यूज – विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Worldcup 2023)अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात सुरु आहे.

येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानाची सुरक्षा भेदत एक चाहता मैदानात शिरला (Worldcup 2023)आणि त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मागच्या बाजूने मिठी मारली. यावेळी मैदानावरील सुरक्षारक्षकांनी लगबगीने त्या चात्याच्या दिशेने धाव घेतली.

Dehuroad : सदनिका घेऊन देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

यावेळी चाह्त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेत त्याला धरून बाहेर नेले. यावेळी त्या चाहत्याच्या अंगावरील टी-शर्टवर “फ्री पॅलेसस्टाईन” अशा आशयाचे मजकूर लिहिलेले होते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.