worldcup 2023 : भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामना वानखेडेवर 15 नोव्हेंबरला

एमपीसी न्यूज – विश्वचषक 2023 मधील साखळी सामन्यात 8 पैकी 8 सामने जिंकत(worldcup 2023) भारताने उपांत्य फेरी सर्वप्रथम गाठ्ण्याची किमया केली. भारताच्या खात्यात 8 विजयांसह 16 गुण आहेत. नियमानुसार विश्वचषक गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या संघाचा उपांत्य सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत खेळवला जाणार आहे.

त्यानुसार दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया संघ विराजमान झाले आहेत. तथापि, चौथ्या क्रमांकासाठी आज 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळ पर्यंत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी चुरस होती.

Pimpri : पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण थांबवा; दोषींवर कारवाई करा

कोलकत्ता येथे सुरु असलेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात दुसऱ्या (worldcup 2023)डावात पाकिस्तानला अपेक्षित षटकांमध्ये इंग्लंडने दिलेले लक्ष्य गाठता आले नाही आणि पाकिस्तानचा संघ नेट रणरेट न्यूझीलंडपेक्षा अधिक राखण्यात अपयशी ठरला. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड सोबत रंगणार आहे. न्यूझीलंड च्या नावे 9 सामन्यात 5 विजयासह 10 गुण जमा आहेत. हा सामना 15 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथील वानखेडे मैदानावर होणार आहे.

दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कोलकत्याच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. उपांत्य फेरीत विजयी ठरलेले संघ अंतिम सामन्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर एकमेकांशी भिडतील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.