PCMC : दप्तर दिरंगाई भोवली! उपअभियंता, कनिष्ठ अभियंता निलंबित

एमपीसी न्यूज – जागेच्या खासगी वाटाघाटीसंदर्भात आठ आठवड्यात (PCMC)योग्य तो निर्णय घेऊन एक आठवड्यात याचिकाकर्त्याला माहिती द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. या आदेशाचे पालन न केल्यामुळे याचिकाकर्त्यांने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी स्थापत्य विभागाच्या एक कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंत्यावर सेवा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत निलेश सोमा दाते हे स्थापत्य विभागात (PCMC)कनिष्ठ अभियंता तर राजकुमार वसंतराव सुर्यवंशी हे उप अभियंता म्हणून कार्यरत आहेत. महापालिकेने कासारवाडी येथे खासगी वाटाघाटीव्दारे जागा घेतली होती. मात्र, या वाटाघाटीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Pimpri : पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण थांबवा; दोषींवर कारवाई करा

याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायालयाने भूसंपादनाबाबत आठ आठवड्यात योग्य तो निर्णय घ्या. या निर्णयाची याचिकाकर्त्यांना एक आठवड्यात माहिती द्यावी, असे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुदतीत प्रस्ताव ठेवून कार्यवाही करण्याची जबाबदारी दाते आणि सुर्यवंशी यांची होती.

मात्र, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर पालिकेने दाते आणि सुर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला.

 

त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे पालिकेच्या लक्षात आले. या दोघांनी वेळीच कार्यवाही केली असती तर पालिकेच्या विरोधात अवमान याचिका दाखल झाली नसती. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दाते व सुर्यवंशी यांचे सेवानिलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी, असा आदेश आयुक्त सिंह यांनी जारी केला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.