Dehugaon : देहूगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

एमपीसी न्यूज – देहूगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण (Dehugaon)यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नऊ नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 तर 2 अपक्ष सदस्य निवडून आले होते. सर्व सदस्यांचा गट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पार्टी या नावाने नोंदविण्यात आलेला आहे. तर, सभागृहात भाजपचा एक सदस्य आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून स्मिता चव्हाण या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या.

Pune : पं. रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित नृत्यभारती तर्फे कार्यक्रम

अविश्वासाचा ठराव दाखल केला असून, त्यात (Dehugaon)नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीचे कामकाज करणे अपेक्षित होते; परंतु नगराध्यक्षा झाल्यापासून नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेऊन व कामकाज करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या विविध योजना व सोयीसुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले नाही.

त्यामुळे नागरिकांमध्ये नगरपंचायतीविषयी अविश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. तसेच, नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता नसल्याचे अविश्वासाच्या ठरावात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.