PCMC : नाट्यगृहातील पैशांचा अपहार, लिपिक निलंबित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील(PCMC) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातातील पैशांचा अपहार करणा-या लिपिकाला आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संकेत सुरेश जंगम (PCMC)हे लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाट्यगृहाच्या कार्यक्रमाची अनामत रक्कम, भाडे यासह इतर शुल्क वसूल करणे, पावत्या देणे, दैनंदिन भरणा लेखा शाखेकडे जमा करणे, रजिस्टर अद्यावत ठेवणे असे कामकाज दिले होते. कार्यक्रमाची भाडे वसूल झाले नाही.

PCMC : दप्तर दिरंगाई भोवली! उपअभियंता, कनिष्ठ अभियंता निलंबित

दोन वर्षांपासून भाड्यासाठी दिलेले डीडी व धनादेश पालिका कोषागरात भरलेले नसून तसेच पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे लिपिक जंगम याचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.