Punavale : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात पुनावळे कचरा डेपो विरोधात निदर्शने

एमपीसी न्यूज – पुण्यातील गहुंजे येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात (Punavale)बहुचर्चित पुनावळे कचरा डेपो विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये तरुणाने “से नो टू गॅरबज डेपो” अशा आशयाचे फलक आपल्या हातात झळकावत निदर्शन केले. याबाबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर सर्वत्र वायरल झाले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळेतील आरक्षित जागेवर कचरा डेपो विकसित(Punavale) करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच पुनावळेत कचऱ्याचे डोंगर उभारले जाणार नाहीत.

PCMC : दप्तर दिरंगाई भोवली! उपअभियंता, कनिष्ठ अभियंता निलंबित
अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून प्रक्रिया केली जाईल. बफर झोन निश्चित केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. प्रशासनाकडून जागा ताब्यात घेऊन डेपो विकसित करण्याची हालचाल सुरू करताच नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुनावळे कचरा डेपोला शहरातील विविध भागातून विरोध होत असून याबाबत आंदोलनं देखील करण्यात येत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधी या डेपोच्या विरोधात असल्याचेही निदर्शनास आले असून याबाबत सर्व पातळीवर निवेदन देण्यात येत असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गहुंजे येथील ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात पुनावळे कचरा डेपो विरोधातील तरुणाचे निदर्शन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.