Pune : पादचारी छायाचित्रकाराला मध्यरात्री मारहाण करीत लुबाडले

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ (Pune) रात्री प्रवास करणाऱ्या तरुणाला चार जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या जवळील सामान लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

या संपूर्ण प्रकाराची दखल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रदीप नाईक यांनी घेतली असून त्यांनी त्वरित पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला. घडलेला प्रकार हा गांभीर्याचा असून पीडितांना न्याय मिळेल असे कर्णिक यांनी सांगितले तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या घटनेचा एफआयआर नोंदवण्याचे त्वरित आदेश दिले.

सविस्तर माहिती अशी, की अभिजीत गाडेकर (वय 30 वर्षे, राहणार सिंहगड रोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अभिजीत गाडेकर हे पेशाने छायाचित्रकार आहेत. ते 3 मे रोजी प्रवास करत असताना मध्यरात्री त्यांच्यासोबत हा प्रकार घडला.

अभिजीत गाडेकर हे संभाजीनगर येथून ट्रॅव्हल्स मार्फत शिवाजीनगर येथे पोहचले. तेथून सिंहगड रोड येथे घरी जाण्यासाठी त्यांनी बस स्टॉपच्या दिशेने चालत प्रवास सुरू केला. एवढ्यातच 20 ते 25 वयोगटातील चार तरुणांनी त्यांना घेरले, त्यांच्याकडून त्यांचा मोबाइल, बॅग आणि पाकीट काढून घेतले. एवढेच नव्हे तर त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण देखील केली. या प्रकाराचा पुणे पोलिस तपास करत आहेत.

Chinchwad : अखिल भारतीय भाईपा संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अशोक पागरिया

या संपूर्ण प्रकारची तातडीने दखल पुणे पोलिसांनी घेतली. पुणे पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल (Pune) प्रदीप नाईक यांनी संदीप कर्णिक आणि पुणे पोलिसांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.