BJP : भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर सदाशिव खाडे यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची (BJP) महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खाडे यांना मुंबईतील नियुक्तीपत्र दिले.

सदाशिव खाडे यांनी  भाजपा मध्ये युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष पदापासून पासून काम केले आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य या पदांवर काम केले आहे.

आता 64 मान्यवरांचा समावेश असणाऱ्या भाजपा प्रदेश (BJP) कार्यकारिणीवर पिंपरी-चिंचवड शहरातून एकमेव  खाडे यांची निवड करण्यात आली आहे. खाडे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळ सदस्य, प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाचे सदस्य तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) या विविध पदांवर देखील काम केले आहे.

Doha Diamond League: नीरज चोप्राची पुन्हा एकदा दमदार कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये अव्वल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.