Doha Diamond League: नीरज चोप्राची पुन्हा एकदा दमदार कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये अव्वल

एमपीसी न्यूज : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने शुक्रवारी (Doha Diamond League) दोहा डायमंड लीग मीटमध्ये 88.67 मीटर भालाफेक करून पुन्हा एकदा यशाचे शिखर पार केले. नीरजने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम आकडा गाठला. यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

सप्टेंबर 2022 मध्येही नीरजने स्वित्झर्लंडमध्ये आयोजित डायमंड लीग ट्रॉफी जिंकली होती. या वर्षीही त्याने सर्वोत्तम कामगिरी करताना दोहा येथे 88.67 मीटर अंतरावर भाला फेकला. त्याने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक केली, ही त्याच्या  कारकिर्दीतील चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. एवढेच नव्हे तर अंतिम फेरीपर्यंत तो यादीत अव्वल राहिला.

चोप्राने गतवर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. पीटर्सने दोहा डायमंड लीग 2023 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर बरोबरी साधली.  2018 मध्ये नीरजने पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्याने चौथा क्रमांक पटकावला होता.

Today’s Horoscope 06 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

भारतासाठी अॅथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या (Doha Diamond League) नीरजचे 90 मीटरचे अंतर पार करण्याचे उद्दिष्ट आहे. 2022 कॉमनवेल्थ गेम्स ट्रिपल जंप चॅम्पियन एल्धोज पॉल देखील दोहा मीटमध्ये त्याला आव्हान देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.