Neeraj Chopra : नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले जागतिक अ‍ॅथलेटीक्सचे पहिले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स (Neeraj Chopra) अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक ॲथलेटीक्सचं पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

गेल्या वर्षी अमेरिकेत पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने रौप्य पदक पटकावलं होतं. मात्र, यावर्षीच्या स्पर्धेत नीरज चोप्राने  संधीचं सोनं करत सुवर्णपदक मिळविले.

Job Info on Twitter : नोकरी संदर्भात माहिती मिळणार ट्विटरवर

फायनलमध्ये नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न फाउल ठरला. पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17  मीटर अंतर गाठले. दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अरशन नदीम राहिला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात बेस्ट थ्रो केला. भालाफेकीत नीरज चोप्राशिवाय भारताचे डीपी मनु आणि किशोर जेना हेसुद्धा फायनलमध्ये होते. मात्र किशोर पाचव्या तर मनु सहाव्या क्रमांकावर राहिले.

भारतासाठी वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक अँड फिल्ड कॅटेगरीत मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याच्याआधी अंजू बॉबी जॉर्ज हिने 2003 मध्ये लांब उडी प्रकारात कांस्य ( Neeraj Chopra ) पदक जिंकलं होतं.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.