Delhi : भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल असे (Delhi ) सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच विजयाचा दावा केला आहे.

Nigdi : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी केली भात लावण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (बुधवारी) प्रगती मैदानातील कनव्हेंशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्याचे नाव भारत मंडपम असे ठेवण्यात आले आहे. 2014 ला जेव्हा जनतेने आमच्या हाती  देशाचा कारभार दिला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमाकांवर होती. आमच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत हा देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे.

Pune : लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत लॉयला प्रशाला दोन वयोगटातून तर हॅचिंग्ज एका गटातून उपांत्य फेरीत

आमच्या तिसऱ्या कार्यकाळात जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचे नाव असेल. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना पाहू शकेल.  देशाचा विकासरथ हा अधिक वेगाने धावेल.

आपल्या देशात काही वेगळ्या विचारधारेचेही लोक आहेत. नकारात्मक विचार करणाऱ्यांची आपल्या देशात कमतरता नाही. भारत मंडपमची निर्मिती रोखण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. कोर्टाच्या फेऱ्याही मारल्या. कोणताही देश, समाज तुकड्यांमध्ये विचार करुन, काम करुन पुढे जाऊ शकत नाही.

आज हे भारत मंडपम ही वास्तू या गोष्टीचीही साक्षीदार आहे की, आमचं सरकार किती दूरचा विचार करुन काम करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी (Delhi ) म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.