Nigdi : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी केली भात लावण

मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा स्काऊट गाईड अंतर्गत अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  (Nigdi ) नुकताच प्रत्यक्षात भात लावणीचा अनुभव घेतला. यामध्ये स्काऊट गाईडच्या मुलांनी सहभाग घेतला होता.नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातुन ज्ञान दिले पाहिजे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अनुभव विश्वात अधिक भर पडणे गरजेचे असते.

श्रमदानाचे मूल्य त्यांच्यामध्ये रुजविण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते .अनेक वेळा शहरी भागातील मुलांना कोणते पीक कुठे येते याची माहिती नसते. केवळ पुस्तकातुन विद्यार्थ्यांना शेती आणि त्यातील पिकांची माहिती होणार नाही तर प्रत्यक्ष अनुभूती महत्वाची असून याच हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मॉडर्नचे प्राचार्य प्रकाश पाबळे यांनी सांगितले .

यासाठी भिंतीपलीकडील शाळा उपक्रमांतर्गत तळवडे ज्योतिबानगर येथील शेतकरी दत्तू मारुती भालेकर व राजू भालेकर यांच्या (Nigdi ) भातशेतीस विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रत्यक्षात गुडघाभर चिखलात जाऊन विदयार्थी आणि शिक्षकांनी भातलावणी केली. यावेळी भातलावणी करणाऱ्या शेतकऱ्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी भर पावसात भात लावणी केली.

Pune : पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांचे मदतनीस कोण? एटीएसकडून तपास सुरू

यातून शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. नंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी भात पिकाबद्दल अनेक प्रश्न विचारून भातशेतीची माहिती मिळविली. यामध्ये भात लावणी पूर्व मशागत कोणती ? भाताची रोपे कशी तयार करतात ? भाताचे पीक किती दिवसात येते ? भातशेतीचे संरक्षण कसे करायचे ? भातपिकाची कापणी साठवण आणि वाळवण या सर्व प्रक्रियेची माहिती शेतकरी मारुती भालेकर यांनी दिली.

यामुळे विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठेचे महत्व कळाले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे ,पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे तर शिक्षक शिवाजी अंबिके ,प्रशांत कुलकर्णी ,अर्चना सुरवसे यांनी नियोजन केले.

तर प्रत्यक्ष शेतीचा अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे ,सहकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह डॉ.निवेदिता एकबोटे ,सचिव शामकांत देशमुख,शाळा समिती अध्यक्ष उद्धव खरे,प्रमोद शिंदे ,आजीव सदस्य राजीव कुटे यांनी कौतुक  (Nigdi ) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.