Pune : पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांचे मदतनीस कोण? एटीएसकडून तपास सुरू

एमपीसी न्यूज – रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी संशयावरून दोन मोस्ट वांटेड दहशतवाद्यांना पकडले. या दहशतवाद्यांची कोठडी आता एटीएसकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत झालेल्या चौकशीतून या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी अनेक महिने पुणे (Pune) शहरात वास्तव्यास होते.

Mumbai Pune Expressway : उद्या एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनी दुपारी 12 ते 2 यावेळेत असणार बंद

या काळात ते आणखी कोणाला भेटले का? त्यांना कोणी मदत केली का या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. तत्पुर्वी या गुन्ह्यात आता युएपीए कलम वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांनी गुन्ह्याचा आढावा घेतला.

 

मोहंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि मोहंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवादी नावे आहेत.  बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १३, १६ ब, १८ आणि २० अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनी आज संपूर्ण गुन्ह्याचा आढावा घेतला. यावेळी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर दाते यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पुणे पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असून, तपासात सर्व बाजू पडताळल्या जात आहेत. अनेक गोष्टी असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. वेगवेगळ्या पथकं काम करत आहेत.

 

दरम्यान, तपासात त्यांनी पुणे, सातारा व कोल्हापूरच्या जंगलात बॉम्ब स्फोटाची चाचणी घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी बॉम्ब स्फोटाची चाचणी नेमकी कोणत्या ठिकाणी घेतली याबाबत चौकशी सुरू आहे. एटीएसकडून सर्व शक्यता गृहीतधरून तपास सुरू आहे. पुण्यात (Pune) दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याची शक्यता आहे. तसेच, दोघांना पुण्यात कोणी सहकार्य केले का, ते कोणाच्या संपर्कात होते का याबाबी तपासल्या जात आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.