Mumbai Pune Expressway : उद्या एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनी दुपारी 12 ते 2 यावेळेत असणार बंद

एमपीसी न्यूज – दिनांक 23 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवर आडोशी (Mumbai Pune Expressway) बोगद्याच्या मागे दरड कोसळली होती. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pune : लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत लॉयला प्रशाला दोन वयोगटातून तर हॅचिंग्ज एका गटातून उपांत्य फेरीत

दरम्यान दरड पडलेल्या भागातील सुटे झालेले दगड व माती काढण्याच्या कामासाठी  सोमवारी दि.24 रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वे ची मुंबई लेन बंद ठेवण्यात आली होती. परंतू उद्या (दिनांक 27)  परत या  दरडमधील डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी दुपारी 12 ते 2 यावेळेत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

या दरम्यान कार वर्गीय वाहने जुन्या महामार्गावरुन शिंगोबा घाटातून खोपोली मार्गे सोडण्यात येणार असल्याची माहिती बोरघाट महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश भोसले (Mumbai Pune Expressway) यांनी आज दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.