Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ( Express Way) क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवार (दि. 26) पासून बदल करण्यात आला आहे.

नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी.

Today’s Horoscope 28 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्ष (9822498224) किंवा महामार्ग पोलीस विभागास (9833498334) संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्यव्यवस्थे विकास महामंडळाने सांगितले ( Express Way) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.