Pune : तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार जागृती शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या तृतीयपंथी  व्यक्तींसाठी मतदार जनजागृती आणि शासकिय योजनांचा ( Pune ) लाभ देण्याकरीता सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे, सीवायडीए संस्था पुणे आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे,  सेंटर फॉर युथ डेव्हलपमेन्ट  ॲण्ड ॲक्टीव्हीटीज  संस्था पुणे यांचे प्रतिनिधी प्रितेश कांबळे, मिलन लबडे आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या  श्रीमती मन्नत आदी उपस्थित  होते.

Today’s Horoscope 28 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सर्वसामान्य व्यक्तींना जीवन जगताना अनेक वेळा आपल्या हक्कांसाठी व मदतीसाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच तृतीयपंथी व्यक्तींना त्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत प्रत्यक्ष व दूरध्वनी क्रमांक 020-25534881 वर मोफत कायदेशीर सल्ला उपलब्ध करुन दिला जाईल, असे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती मन्नत यांनी नवीन आधारकार्ड बनवणे, आधारकार्डमध्ये दुरुस्ती करणे, शिधापत्रिका बनवणे, इंडियन पोस्ट ऑफिसचा 600 रुपयांचा अपघाती विमा योजनेकरीता नाव नोंदणी करण्याबाबत माहिती दिली.

सहायक आयुक्त लोंढे यांनी या शिबीरास उपस्थित असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना मतदार ओळखपत्र व त्यांचे महत्त्व याविषयाबाबत माहिती देवून सर्वसामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणे पारलिंगी व्यक्ती या देशाचे समान नागरिक असल्याने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. शिबीरात उपस्थित तृतीयपंथी  व्यक्तींना प्रोटीन किटचे वाटप करण्यात ( Pune ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.