Today’s Horoscope 28 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 28 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- बुधवार

तारीख – 28 . 02 .2024.

शुभाशुभ विचार- शुभ दिवस.

आज विशेष – संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 21.44 ).

राहू काळ – दुपारी 12.00  ते 01.30 .

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – हस्त 7.33 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या 21 पर्यंत नंतर तूळ.

—————————–

मेष – ( शुभ रंग – हिरवा)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. कुसंगतीमुळे प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. सतर्क रहा.

वृषभ-  ( शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज जोडीदाराला दिलेले शब्द पाळावे लागतील.

मिथुन – ( शुभ रंग- मरून )

ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. रुग्णांनी पथ्य पाणी पाळावे. गृहिणीसाठी आज अतिव्यस्त दिवस आहे.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होईल.

सिंह -( शुभ रंग – जांभळा)

आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

कन्या – ( शुभ रंग- राखाडी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हानांना यशस्वीपणे तोंड द्याल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होऊ शकतील.

तूळ – ( शुभ रंग- भगवा)
आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आवक उत्तम असताना बचतीला प्राधान्य द्यायला हवे.

वृश्चिक-  ( शुभ रंग – पिस्ता)
कार्यक्षेत्रात दुपारनंतर अनुकूलता वाढेल. तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. एखादी गहाळ झालेली वस्तू आज दुपारनंतर अचानक सापडेल.

धनु – (शुभ रंग- मोरपंखी)
सर्व महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका. आज संध्याकाळी काही जुनी मित्रमंडळी भेटतील. मॉलमध्ये फेरफटका मारून आज तुम्ही काही अनावश्यक खर्च कराल.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रातील काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खिशात पैसा खेळता राहील. प्रतिष्ठित लोकांमधील तुमची उठबस व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल.

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरदारांना आज वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. गृहिणींना घरातील थोरामोठ्यांची मने जपावी लागतील.

मीन-  ( शुभ रंग- आकाशी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रयत्नांना दैव नक्कीच साथ देईल. तरुण वर्गाने हौस करताना कायद्याचे उल्लंघन करू नये.

 

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.