Police Officers Transfer : राज्यातील 129 पोलीस निरीक्षक, 73 सहायक निरीक्षक आणि 216 उपनिरीक्षकांची बदली

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकांच्या (Police Officers Transfer) पार्श्वभूमीवर बदल्या केल्या जात आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सोमवारी (दि. 26) आणि मंगळवारी (दि. 27) पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

राज्यातील 129 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील गणेश जवादवाड, कृष्णदेव खराडे, अमरनाथ वाघमोडे, शंकर अवताडे, संजय तुंगार, अशोक कदम, राम राजमाने, वसंतराव बाबर, श्रीराम पौळ, राजेंद्र निकाळजे, बडेसाब नाईकवाडे, संतोष कसबे, रमेश पाटील या 13 जणांचा समावेश आहे. तर शहरात कन्हैया थोरात, निवृत्ती कोल्हटकर, अंकुश बांगर, अशोक कडलग, नितीन गीते, विजय वाघमारे, संजय गायकवाड, संदीप सावंत, सुहास आव्हाड, प्रमोद वाघ हे पोलीस निरीक्षक शहरात आले आहेत.

राज्यातील 73 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये (Police Officers Transfer) पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दिलीप जाधव, विशाल जाधव, अभय दाभाडे, सारंग चव्हाण, सागर काटे, समीर वाघ, स्पृहा चिपळूणकर, तौफिक सय्यद, स्वप्नाली पलांडे, योगेश गायकवाड, राकेश गुमाणे, मंगल जोगन या 12 जणांचा समावेश आहे. शहरात नव्याने सहायक पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आलेली नाही.

PCMC : डेअरी फार्म पुलाला अडथळा ठरणारी झाडे तोडणार

राज्यातील 216 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रशांत पासलकर, विजय जगदाळे, नयना कामथे, संगीता गोडे, प्रदीप गायकवाड, रोहन गायकवाड, विद्या माने, सागर बामणे, महेंद्र गाढवे, अमोल ढेरे, सचिन चव्हाण, रुपेश साबळे, रोहित दिवटे, मिनिनाथ वरुडे, गोविंद चव्हाण, विवेक कुमटकर, विकास मडके, रवींद्र भवारी, निलेश चव्हाण, काळू गवारी, गणेश गायकवाड, उत्तम ओमासे, संदीप जाधव, गोविंद पवार, यशवंत साळुंखे, विनोद शेंडकर, नवनाथ कुदळे, अशोक तरंगे, श्रीकांत साकोरे, प्रशांत थिटे, प्राजक्ता धापटे, संजय ढमाळ, कोंडीभाऊ वालकोळी, जीवन मस्के, संग्राम मालकर, नागेश येळे, वर्षा कादबाने, संजय बारवकर, हिरामण किरवे, कृष्णहरी सपकाळ, संतोष येडे, श्रीकृष्ण दरेकर, रमेश पवार या 43 अधिकार्यांचा समावेश आहे.

तर अश्विनी उबाळे, प्रकाश कातकाडे, नाईद शेख, वैशाली गुळवे, अश्विनी तळे, अजय राठोड यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.