Pune : सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनीही घेतली अनंतराव थोपटे यांची भेट

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही अनंतराव थोपटे यांची भेट घेतली.

यावेळी आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते. गेल्या कित्येक वर्षांपासून पवार आणि थोपटे संघर्ष सर्वश्रुत आहे. थोपटे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना पवारांनी राष्ट्रवादीचा उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. आता बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी शरद पवार मतांची जुळवाजुळव करण्यासाठी थोपटे कुटुंबाशी जुळवून घेत असल्याचे बोलले जात आहे.

Pune : महिला दिनानिमित्त हॉकी महाराष्ट्र आणि पुनीत बालन ग्रुपकडून महिला हॉकीपटूंचा सन्मान

25 वर्षानंतर पवार आणि थोपटे यांची भेट झाली. आगामी बारामती लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

जागा वाटपात बारामती लोकसभा मतदारसंघ हा अजित पवारांच्या वाट्याला येणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार असल्याने त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रवादीतर्फे त्यांना नुकतेच तुतारी वाला माणूस हे चिन्ह (Pune) मिळाले आहे. हे चिन्ह पोहोचवण्यासाठी सुळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मतदारसंघात जागोजागी हे तुतारीचे हे चिन्ह लावण्यात आले आहे. तर, शरद पवार यांनी भेटीत अनंतराव थोपटे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.