Pune : समान पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार?

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी अतिशय (Pune) महत्वपूर्ण असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या समान पाणीवाटप योजनेचे काम सुरू होऊन आठ वर्ष उलटली आहेत. पण, ही योजना अपूर्णच आहे. सर्व झोन मधील कामे पूर्ण होण्यास 2025 उजाडण्याची पुणेकरांना वाट पाहावी लागणार आहे. या योजनेमुळे पाण्याची गळती थांबणार आहे.

पुणे शहराच्या सर्व भागात समान दाबाने व कायम पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. 2016 मध्ये ’24 बाय 7′ पाणीपुरवठा योजना या नावाने या योजनेची सुरुवात झाली. पण, सर्वच भागाला चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने तसेच राजकीय विरोधानंतर या योजनेचे नामकरण समान पाणीपुरवठा योजना असे करण्यात आले. पुढील 30 वर्षांचा विचार करून शहराची लोकसंख्या 50 लाख गृहीत धरून या योजनेची आखणी करण्यात आली आहे.

Pune : महिला दिनानिमित्त हॉकी महाराष्ट्र आणि पुनीत बालन ग्रुपकडून महिला हॉकीपटूंचा सन्मान

या शिवाय शहरातील पाणी वितरणामधील 40 टक्के गळती कमी करणे हे ही या योजनेचे एक उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. हा खर्च कर्ज, कर्जरोखे आणि महापालिकेच्या उत्पन्नातून केला जात असून त्यासाठी मिळकतकराचा भाग असलेली पाणीपट्टीही पाच वर्षात शंभर टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.

सध्या पुणे महापालिका धरणातून 18 टीएमसी पाणी (Pune) उचलते. 2 वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी एवढे पाणी उचलण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. समान पाणीपुरवठा योजनेमुळे 50 टक्के पाण्याची बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.