Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार काही ठरेना

एमपीसी न्यूज – येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणूक जाहीर (Pune) होणार आहे. मात्र, अद्यापही या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतर्फे उमेदवार काही ठरेना. भाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभेचा उमेदवार ठरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या पहिल्या यादीत उमेदवार काही घोषित केला नाही. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार ठरणार असल्याची कुजबूज सुरू आहे.

भाजपतर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. राज्यसभेचे माजी खासदार संजय नाना काकडे यांनीही आपण इच्छुक असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर यांनीही कार्यक्रम आयोजित करून प्रबळ इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे.

Pune : सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनीही घेतली अनंतराव थोपटे यांची भेट

काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसतर्फे 20 जणांनी इच्छुक असल्याचा दावा केला आहे. तसे उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक (Pune) होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक लांबविली. त्यामुळे उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यावर निवडणूक आयोगाला सुनावण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.