Nigdi : अखेर निगडी येथील भुयारी मार्ग वापरासाठी खुला

एमपीसी न्यूज – निगडी प्रभाग क्रमांक 13 गावठाण येथील (Nigdi) भुयारी मार्गाचे उद्घाटन तेथील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी स्थानिक वर्ग, विद्यार्थी व व्यापारी वर्गाची होती. यानुसार महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून भुयारी मार्ग बनविण्यात आला.

हा भुयारी मार्ग होण्याआधी रस्ता ओलांडत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्ग व महिलावर्ग यांचा अपघात झाला व तर अनेक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. हे होणारे अपघात थांबावेत म्हणून महापालिकेकडून निगडी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हा पूल बांधून पूर्ण झाला होता. आज भुयारी मार्गाचे लोकार्पण झाल्यामुळे नागरिक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. निगडीतील या भुयारी मार्गामुळे नक्कीच अपघातास आळा बसणार आहे. यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहे. पालिका प्रशासन, आयुक्त यांचे नागरिकांनी आभार मानले.

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार काही ठरेना

या उद्घाटन प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवनेकर, देवेंद्र निकम, चंद्रकांत दानवले, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर, मारुती भापकर , राजेंद्र काळभोर ,मधुराज पवळे (Nigdi) , रोहीत काळभोर , मंगेश काळभोर , सागर सोनटक्के , नजीर खाटीक व प्रभागातील जेष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.