Pune : महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हिलींग हॉस्पिटलच्या श्रेयवादावर पुण्यात जोरदार फ्लेक्सबाजी

एमपीसी न्यूज – कै. अरविंद बारटक्के रुग्णालयाच्या (Pune) इथे रविवारी होणाऱ्या वारजे येथील पुणे महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हिलींग हॉस्पिटलच्या भूमिपूजन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे.

 

या कामावरून गटातटाचे बॅनर संपूर्ण प्रभागांमध्ये झळकत आहेत. एका बाजूला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यांच्या नेते मंडळींचे फोटो एका बॅनरवर तर दुसऱ्या बाजूला माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो बॅनरवर टाकत गेल्या सात वर्षाच्या पाठपुराव्याला यश, अशा आशयाचे बॅनर वारजे परिसरात लावल्याचे दिसून येत आहेत.

Nigdi : अखेर निगडी येथील भुयारी मार्ग वापरासाठी खुला

राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाल्यावर वारजे – माळवाडी परिसरात (Pune) त्याचे पडसाद उमटले आहेत. हॉस्पिटलच्या निमित्ताने दोन्ही गटांनी जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे. त्याची सध्या खमंग चर्चा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.