Pune : आयुक्तांनी केलेली 550 कोटींची तरतूद राष्ट्रवादी काँग्रेससाठी लाभदायक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी (Pune) अंदाजपत्रकात समाविष्ट गावांच्या विकासासाठी 550 कोटी रुपयांची केलेली तरतूद राष्ट्रवादी काँग्रेससाठी लाभदायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी 550 कोटींची तरतूद महापालिकेने केली आहे. समाविष्ट गावांपैकी काही गावे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे.

महापालिका हद्दीमध्ये ऑक्टोबर 2017 मध्ये 11 आणि त्यानंतर जुलै 2021 मध्ये 23 गावे अशा एकूण 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये पायाभूत सुविधा तातडीने दिल्या जातील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. पण, रस्ते, सांडपाणी वाहिन्या, पाणीपुरवठा, वीज अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अपयश आले होते.

Pune : महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हिलींग हॉस्पिटलच्या श्रेयवादावर पुण्यात जोरदार फ्लेक्सबाजी

त्यातच महापालिकेने येथील मिळकतींना तिप्पट दराने मिळकतकर आकारणी (Pune) केली आहे. त्या विरोधातही स्थानिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना दिलासा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन समाविष्ट गावांमधील शिष्टमंडळाने तिप्पट दराने मिळकतकर आकारणी संदर्भात स्थगिती मिळविली. समाविष्ट गावे बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.