Pune : उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, नदीवर पूल बांधण्याची कामे लवकरच होणार पूर्ण

एमपीसी न्यूज – घोरपडी पुणे येथे (Pune) पुणे सोलापूर व पुणे-मिरज रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुमारे 80% पूर्ण झाले आहे, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

सिंहगड रोड येथे नवीन उड्डाणपूल बांधणे-सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम थिएटर पर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम 60% पूर्ण झाले आहे. सनसिटी, सिंहगडरोड ते कर्वेनगर नदीवर पूल बांधणेचे काम प्रत्यक्ष जागेवर काम सुरु आहे. कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर पुलाची (आगाखाना पूल) 10 मी.रुंदी वाढविणेचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरु आहे. तर, साधू वासवानी पूल (कोरेगावपार्क) ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करून तदनुषंगिक कामे प्रत्यक्ष जागेवर सुरु आहेत.

Pune : आयुक्तांनी केलेली 550 कोटींची तरतूद राष्ट्रवादी काँग्रेससाठी लाभदायक

पुणे मनपा हद्दीतील दहा वर्षापेक्षा जास्त जुने (Pune) असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, त्यामध्ये पुलांचे एकूण 40 पुलांचा समावेश आहे. या ऑडिट नुसार दुरुस्तीसाठी सुचविण्यात येणाऱ्या पुलांचे प्राधान्यक्रमानुसार दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका संयुक्त विद्यमाने (प्रत्येकी 5% खर्च) सांगवी- बोपोडी मुळा नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.