Dehuroad : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे पोलिसांचा रूट मार्च

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Dehuroad) पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूटमार्च केला. मंगळवारी (दि. 12) सकाळी पार पडलेल्या या रूट मार्चमध्ये 17 अधिकारी आणि 107 अंमलदार सहभागी झाले.

रूटमार्चची सुरुवात शिवाजी विद्यालय देहूरोड येथून झाली. हा रूटमार्च पुढे जामा मजीद आंबेडकर नगर- स्वामी चौक -सुभाष चौक -वृंदावन हॉटेल रेल्वे स्टेशन- सवाना चौक -नेटके कॉलनी-विजडम स्कूल- विकास मेडिकल मार्गे मुकाई चौक येथे शांततेत पार पडला.

Chinchwad : अवघ्या अडीच महिन्यात वाहतूक पोलिसांनी उतरवले पाच हजार फॅन्सी नंबर प्लेट आणि मॉडिफाइड सायलेन्सर

यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह पाच पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, तसेच देहूरोड, रावेत, शिरगाव, तळेगाव, मुख्यालयातील दोन आरसीपी पथक तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडील (Dehuroad) यूएआयडी 830 क्रमांकाची कंपनी असे मिळून एकूण 17 अधिकारी व 107 अंमलदार हजर होते.

देहूरोड पोलीस ठाण्यातील बीट मार्शल, डायल 112, देहूरोड, रावेत, शिरगाव व तळेगाव कडील मोबाईल 1 वाहन, देहूरोड मोबाईल 2, मोबाईल 3 वाहने देखील सहभागी झाली होती.

आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी सर्व स्तरावर तयारी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी केली जात आहे. तसेच संबंधितांसोबत बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केला जात आहे. आता पोलिसांनी रूटमार्चला देखील सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.