Moshi : अधिक परताव्याचे आमिष दाखवून कंपनीत गुंवणुक करण्यास भाग पाडत 57 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास (Moshi) अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन गुंतवणूकदारांची 57 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार मोशी येथील यंत्रा कंपनी येथे 30 नोव्हेंबर 2022 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी राजेश रघुनाथ आमले (वय 43 रा. पिंपळे गुरव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जितेंद्र मनोहर बल्लाडकर (रा. तपकीर नगर मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे पोलिसांचा रूट मार्च

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर गुंतवणुक दारांना आरोपीने त्याच्या यंत्रा कंपनीमध्ये 1 लाख गुंतवणूक केल्यास प्रती महिना 10 हजार जास्तीचा नफा देईन असे वर्षा अखेर 2 लाख 20 हजार रुपये मिळतील असे आमिष (Moshi) दाखवले त्यानुसार फिर्यादी यांनी 43 लाख गुंतवले त्यातील 5 लाख परत केले. मात्र 38 लाख रुपयांची फसवणूक केली.

अशाच प्रकारे फिर्यादीत मित्र 10 लाख 21 हजार व 9 लाख 50 हजार अशी एकूण 57 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.