PCMC : डेअरी फार्म पुलाला अडथळा ठरणारी झाडे तोडणार

एमपीसी न्यूज – पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाणपुल (PCMC)बांधणेकामी नियोजित उड्डाणपूल बांधकामास अडथळा ठरत असलेले वृक्ष तोडण्यासाठी, वृक्षांच्या मुल्यांकनाची रक्कम संरक्षण विभागासोबत झालेल्या करारानुसार संरक्षण विभागास जमा करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापालिकेच्या फ प्रभागातील क्रिडा स्थापत्य विषयक किरकोळ कामे करण्यासाठी तसेच महापालिका क, ड, ग, फ, इ प्रभागमधील उद्यानांची स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

जुनी सांगवी मधील मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यासाठी तसेच (PCMC)प्रभाग क्र. 32 मधील सांगवी परिसरातील मनपा इमारती, स्वच्छतागृह व इतर इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि महापालिका प्रभाग क्र. 20 संत तुकारामनगर मधील वायसीएम हॉस्पिटलमध्ये स्थापत्य विषयक व फर्निचर विषयक कामे करण्यासाठी आणि महापालिका प्रभाग क्र. 10 शाहूनगर व इतर परिसरात पावसाळी गटर्स, स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका प्रभाग क्र. 26 पिंपळे निलख येथील मनपा दवाखाना, व्यायामशाळा व तालीम यांचे नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच पिंपळे गुरव परिसरात जलनि:सारण विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

Chakan: दगडाने ठेचून खून; हत्येचा व्हिडीओ बनवून दहशत, दोन अल्पवयीन  ताब्यात

महापालिकेचे क क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. 2, 6, 8, 9 मध्ये औष्णिक धुरीकरण करण्यासाठी वॅन फॉग मशिन ठेवुन कामकाज करण्यासाठी आवश्यक डिझेलवर चालणारे तीनचाकी रिक्षा टेम्पो वाहनचालकासह भाड्याने घेण्यासाठी तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या विविध विभागांसाठी आवश्यक संगणक स्टेशनरी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. 18 मधील पावसाळी पाण्याच्या नलिकांची डागडुजी करणे व साफसफाई करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. 16 रावेत वाल्हेकरवाडी व किवळे मधील अनाधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यासाठी व इतर स्थापत्य विषयक कामासाठी मशिनरी पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेचे प्रभाग क्र. 9 आण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील दिवाणी न्यायालयाचे स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच बीआरडीएस कॉरीडॉर – 1 मार्गाचे सेवा रस्ते व फुटपाथ, डेडीकेटेड लेन, बस स्टॉपची दुरूस्ती अनुषंगिक आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार केलेल्या  कामांची अत्यावश्यक दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. 10 मधील महापालिका इमारतीचे  स्थापत्य विषयक व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि विद्यानगर, संभाजीनगर मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्रभाग क्र. 26 पिंपळे निलख येथील कावेरीनगर, पोलीस वसाहतीमधील उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तसेच कासारवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाचे नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. 2 मधील पवार वस्ती व भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ते पावसाची पाईपलाईन टाकून डांबरीकरण करण्यासाठी तसेच वैद्यकीय विभागाच्या थेरगाव व भोसरी रुग्णालयातील नेत्ररोग विभागासाठी ओसीटी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च 2024 अंतर्गत आय.पी.पी.आय साठी लस, साहित्य व मनुष्यबळ वाहतुक तसेच पर्यवेक्षकीय कामकाजासाठी सुमो/जीप किंवा तत्सम वाहने उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रभाग क्र. 9 मधील परिसरातील रस्त्यांचे चर डब्ल्यु.एम.एम व बी.बी.एम पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली.

फुगेवाडी व दापोडी परिसरात मुख्यालय स्तरावर डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. 15 निगडी प्राधिकरण भागातील महापालिका शाळा इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रातंर्गत प्रभाग क्र. 8 मध्ये जलनि:सारण नलिका व मॅनहोल चेंबर्सचे वार्षिक देखभाल दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीस मान्यता देण्यात आली.

 

महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 मधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाची सुशोभिकरणाची व इतर स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी तसेच मंजुर विकास योजनेतील रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकत धारकास खाजगी वाटाघाटीने देण्यासाठी येणाऱ्या खर्चास,

महापालिका कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालय निहाय कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करण्यासाठी तसेच शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा व माध्यमिक विभागाचे माध्यमिक विद्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) यांचे इमारती, परिसराची दैनंदिन साफसफाई करणे व इमारतीमधील स्वच्छतागृहांची यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

क, ब प्रभागातील क्रिडा स्थापत्य विषयक किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. 12 तळवडे येथील बाठेवस्ती, लक्ष्मीनगर, संत तुकारामनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणेवस्ती, म्हेत्रेवस्ती, धनगरबुवा भागात जलनि:सारण नलिकांची व चेंबर्सची देखभाल दुरूस्तीची कामे करणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि रावेत, शिंदे वस्ती व इतर परिसरामध्ये जलनि:सारण नलिका बदलणे व ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

इ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भोसरी, दिघी, बोपखेल मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणे व डांबरी रस्त्याखाली गेलेले चेंबर्स रस्त्याच्या समपातळीस घेण्यासाठी तसेच राष्ट्रीय नागरी सुधारणा अंतर्गत (अमृत) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबविणे (अमृत योजना टप्पा-2) अंतर्गत विद्युत यांत्रिकी विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

खासगी बँकेमध्ये अतिरिक्त निधी गुंतवणूक करण्यासाठी तसेच महापालिकेच्या विविध विकास प्रकल्प योजनेसाठी आवश्यक कर्ज/कर्जरोखे उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चास आणि गणेश तलाव से.नं. 26 प्राधिकरण, निगडी येथील 2 लॉनटेनिस कोर्ट भाड्याने चालविण्यात देण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील पदव्युत्तर शिक्षण संस्थेच्या 11 मजली नवीन इमारतीकरिता महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) मार्फत यांच्याकडील 17 सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीबाबत करारनामा करून येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली येथे निवासी गाळे बांधणे प्रकल्पातील मूलभूत सुविधा पुरविणे कामांतर्गत विद्युत विषयक कामे करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. 9 मधील परिसरातील आवश्यक ठिकाणी किरकोळ देखभाल दुरूस्तीची कामे करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी आणि प्रभाग क्र. 2 जाधववाडी गट नं. 539 येथील सावतामाळी मंदिराशेजारील सांस्कृतिक केंद्र परिसरातील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

महापालिकेच्या प्रभाग क्र. 20 संत तुकारामनगर मधील वायसीएम हॉस्पिटल बाहेरील रंगरांगोटी व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. 25 वाकड येथील शंकर कलाटेनगर परिसरात व इतर भागात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

PCMC : महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांची शिक्षणाधिकारीपदी बदली

महापालिकेच्या प्रभाग क्र. 15 निगडी प्राधिकरण विभागातील से. 24 निगडी गावठाण व इतर परिसरातील डांबरी रस्त्याची दुरूस्तीची कामे करण्यासाठी प्रभाग क्र. 24 थेरगाव येथील आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी परिसर व इतर परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. 28 पिंपळे सौदागर येथील काटेवस्ती व कुंजीरवस्ती येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. 27 रहाटणी येथील विविध रस्ते बीएम व बीसी पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

चिंचवड मतदार संघातील प्रभाग क्र. 23 प्रसूनधाम ते डी मार्ट पर्यंत जाणारा रस्ता  विकसित करण्यासाठी तसेच प्रभाग क्र. 4 मध्ये दिघी भागात फायर स्टेशन बांधण्यासाठी आणि प्रभाग क्र. 4 दिघी गावात नव्याने ताब्यात आलेले रस्ते विकसित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.