PCMC : महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांची शिक्षणाधिकारीपदी बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील संगिता घोडेकर यांची प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात येत आहे. याच अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.

MNS : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेची मराठीत स्वाक्षरी मोहीम

प्रशासन अधिकारी म्हणून मिळालेल्या कालावधीत शाळा दुरुस्ती, इ क्लास, ग्रंथालय, आदर्श शाळाभेट, भारत दर्शन, रोस्टर, संचमान्यता, आरोग्य धन्वंतरी योजना, शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणने, दिव्यांग मुलांसाठी शिबिरे, स्पर्धा आयोजन, प्राथमिक (PCMC) शिक्षक वरिष्ठ श्रेणी, मुख्याध्यापक पदोन्नती, ऑनलाईन बदल्या, तंत्र स्नेही शिक्षकांकडून व्हिडिओ निर्मिती, चॅनल सुरू केले, यासह विविध कामे केल्याचे नाईकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.