MNS : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेची मराठीत स्वाक्षरी मोहीम

एमपीसी न्यूज – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेने (MNS) मराठीत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. अनेक मान्यवरांनी, पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी प्रतिसाद दाखवून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मराठी स्वाक्षरी केली.

पिंपरीत ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्राचा गौरव म्हणून व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी जो न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याप्रमाणे कायद्याचे उल्लंघन न करता लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानावरच्या पाट्या मराठीत लावण्याचे आवाहन व्यापारी संघटनेला केले.

Chinchwad : चीनमधून ऑनलाईन मागवला कागद आणि छापल्या बनावट नोटा

त्वरित पाट्या बदला अन्यथा मनसे स्टाईलने (MNS) तीव्र आंदोलनाला शहरात उभे राहील. पिंपरी-चिंचवड शहरात ज्या दुकानावर मराठी पाट्या आहेत त्या दुकानदारांंचा निगडी प्राधिकरण येथे सत्कार करण्यात आला.

शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, राजू सावळे, बाळा दानवले, राजू भालेराव, शैलेश पाटील, अनिताताई पांचाळ, वैशाली बोत्रे, नितीन चव्हाण, जयसिंग भाट, नारायण पठारे, केके कांबळे, शिशिर महाबळेश्वर, सतीश झारखंड, आकाश सागरे, उल्हास जयकर, जितेश वाल्लेकर, वैशाली कोराड, चेतन कुलकर्णी, कैलास दुर्गे,आप्पा कांबळे, शुभम सातपुते, पवन सुरेश, आकाश पांचाळ सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.