Chinchwad : चीनमधून ऑनलाईन मागवला कागद आणि छापल्या बनावट नोटा

एमपीसी न्यूज – चलनी नोटा छापण्यासाठी आवश्यक असलेला कागद (Chinchwad )चीनमधून ऑनलाईन माध्यमातून मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नोटा छापण्याची मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ऋतिक चंद्रमणी खडसे (वय 22, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव, मूळ रा. (Chinchwad )मंगरुळपीर, जि. वाशिम), सुरज श्रीराम यादव (वय 41, रा. चऱ्होली), आकाश विराज धंगेकर (वय 22, रा. आकुर्डी, मूळ रा. अंबेजाेगाइ, ता. जि. धाराशिव), सुयोग दिनकर साळुंखे (वय 33, रा. आकुर्डी, मूळ रा. दुधवंडी, ता. पलूस, जि. सांगली), तेजस सुकदेव बल्लाळ (वय 19, रा. अरणगाव, ता. भूम, जि. धाराशिव), प्रणव सुनील गव्हाणे (वय 30, रा. आळंदी रस्ता, भोसरी ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक खडसे हा माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील पदविका (डिप्लोमा) धारक आहे. तसेच सुरज यादव हा वाहन चालक आहे. छपाइचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ऋतिक, सुरज आणि त्यांचे इतर साथीदार एकत्र आले. त्यासाठी त्यांनी दिघी येथील मॅगझीन चौक परिसरात एक गाळा भाडेतत्त्वावर घेतला. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईचे एक जुने ऑफसेट मशिन आणले. त्यावर पत्रके तसेच इतर छपाईची कामे करण्याची त्यांनी तयारी केली.
मात्र, त्यांना छपाईची कामे मिळाली नाहीत. त्यामुळे गाळ्याचे भाडे आणि इतर खर्च वाढला. त्यातून आर्थिक बोजा पडत असल्याने काही तरी वेगळे करण्याचे त्यांनी ठरवले.
‘‘मला नोटांचे डिजाइन करता येते. चलनी नोटा छापल्यास आपल्याला मोठा फायदा होईल’’, अशी कल्पना सुरज याला सुचली. त्यानुसार त्यांनी चीन येथून ऑनलाईन माध्यमातून तेजस बल्लाळ याच्या पत्त्यावर कागद मागवला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 70 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई केली. या नोटा देण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला. एक लाखाच्या बनावट नोटांच्या बदल्यात 40 हजार रुपये देण्याचे ठरले.

त्यानुसार ऋतिक हा 70 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा घेऊन किवळे येथील मुकाई चौकात आला. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून ऋतिक आणि त्यानंतर त्याच्या साथीदारांना अटक केली.

Pune : उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा – दिलीप देशमुख

पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा छापता येतील इतका कागद चीन येथून मागवण्यात आला होता. त्यातील 70 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांची छपाई झाली होती. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणात चलनातील बनावट नोटा, छपाई मशिनसह कागद असा एकूण पाच लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या नोटा छापण्यासाठी आरोपींनी शाई कोठून आणली याचा पोलीस शोध घेत आहेत.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात घरातच भारतीय चलनातील नोटा छपाईचा प्रकार समोर आला होता. हिंजवडी पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी कारवाई करून बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तसेच अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल केला.
यात दोघांना अटक केली. त्यापाठोपाठ किवळे येथे बनावट नोटांप्रकरणी देहूरोड पोलिसांनी कारवाई केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाच महिन्यात बनावट नोटा छापणारे दुसरे रॅकेट गजाआड केले. यापूर्वी निगडी आणि खडकी येथे देखील बनावट नोटा छापल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.