Pune : उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा – दिलीप देशमुख

एमपीसी न्यूज : उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण (Pune) अभ्यास करावा. सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते. तसेच, कठोर परिश्रमामुळे परीक्षेत यश प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान व इंग्रजी यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल, त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा. संपूर्ण पेपर व्यवस्थित व चोख पद्धतीने लिहावा, असे आवाहन गणित तज्ञ दिलीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

मातृ पितृ प्रतिष्ठान व नगरसेवक प्रविण चोरबेले याच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या शाळेमधील दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येते.

Pimpri : शहरातील फेरीवाल्यांचे मुंबईत आंदोलन

याप्रसंगी चोरबेले यांनी सांगितले की, परीक्षा काळात पालक आणि पाल्यात सुसंवाद घडून विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण लाभावे, जेणे करून त्यांचा आत्मविश्वास (Pune) वाढून त्यांना परीक्षेची तयारी करणे अधिक सुकर होईल. परीक्षेचे दडपण येण्याऐवजी आत्मपरीक्षण म्हणून त्याकडे पाहून यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी विद्यार्थी तयार होतील व परीक्षेच्या काळात वेळेवर शाळेमध्ये उपस्थित राहावे व संपूर्ण पेपर व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा न घाबरता न टेन्शन घेता मन लावून पेपर सोडवा व सकाळी लवकर उठून अभ्यास करावा , परीक्षेच्या काळात एक तास अगोदर परीक्षेसाठी जावा व कुठलाही विद्यार्थी कॉपी करू नये असे मार्गदर्शन प्रवीण चोरबेले यांनी विद्यार्थ्यांना केले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, जयराम पारधी, प्रकाश शिंदे, अनिल भन्साळी, शिवा केंगारे, राजेंद्र सरदेशपांडे, मयूर कोठारी, अमित माशाळे यांच्यासह अनेक विद्यार्थी शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.