Pune: शिंदे, फडणवीस यांनी आरोप करताना भान बाळगावे – शरद पवार

एमपीसी न्यूज – मी जरांगे यांना केवळ 1 वेळ भेटलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Pune)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करताना भान बाळगावे. माझा जरांगेशी कळीमतर संबंध नाही.
आमची काय चौकशी करायची ते करा, असे आव्हान माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Pune)यांनी दिले. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते. जरांगेच्या पाठीमागे मी आहे, हा शिंदे आणि फडणवीस यांचा पोरकटपणा आहे, असाही हल्लाबोल पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. आमच्या सर्वच राजकीय पक्षात उत्तम संवाद सुरू आहे. वंचित बाहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत यावे, अशी चर्चा सुरू आहे. उद्या आंबेडकर यांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकांना पर्याय हवा, समविचारी पक्षांना सोबत घेऊ, सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरवोच्च न्यायलायात टिकणार की नाही, ते आताच सांगता येणार नाही. सुनेत्रा पवार यांच्या बाबत प्रश्न विचारला असता, लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. तर, अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असेही पवार यांनी निक्षून सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=i-EMCHflbtI&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.