Modi Awas Gharkul Yojana : मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आरंभ

एमपीसी न्यूज –  मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर ( Modi Awas Gharkul Yojana ) मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा आरंभ प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज  28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Pune : तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदार जागृती शिबिराचे आयोजन

आर्थिक वर्ष 2023-24 ते  2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2023-24 मध्ये मंजूर 3 लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे.

राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून 17,00,728 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 7,03,497 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “महा आवास अभियान 2023-24” अंतर्गत 7 लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार ( Modi Awas Gharkul Yojana ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.