Pune : येरवडा परिसरात दहशत माजवत दोन जणांकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पुण्यात  दहशत माजवून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये ( Pune )  वारंवार वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील येरवडा परिसरात सोमवारी मध्यरात्री दहशत माजवत  पुन्हा दोन जणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.

Modi Awas Gharkul Yojana : मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आरंभ

अजय चित्रगुप्त बागरी,सुमीत भारत सितापराव असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे  आहेत.

सोमवारी मध्यरात्री पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत दोन जणांनी 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली.

परिसरात दहशत माजवण्यासाठी त्यांनी  हे कृत्य केले . याप्रकरणी येरवडा पोलीसांनी दोनही आरोपींना अटक ( Pune ) केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.