Adhegaon: कार व ट्रकचा अपघातात दोघांचा मृत्यू , चौघे जखमी

एमपीसी न्यूज –  कार व ट्रकच्या अपघातात (Adhegaon)दोघांचा मृत्यू झाला आहे तर चौर जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.21) पहाटे मुबई-पुणे एक्सप्रेस वे वर आढेगाव येथे घडला.

यावरून महिलेने शिगराव परंदवाडी पोलीस(Adhegaon) ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एच आर 38 ए.ए.2730 या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Mp Shrirang Barne : सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार घरांचा ताबा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या गाडीने जात असताना आरोपीने वाहतुकीचे नियम न पाळता हयगयीने चालवून फिर्यादीच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात फिर्यादीचे सासरे व नणंद यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी, त्यांचे पती, सासू, चुलत सासरे हे जखमी झाले आहेत.  यावेळी फिर्यादी व इतरांना मदत न करता ट्रक चालक तिथून पसार झाला. शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.